PostImage

Avinash Kumare

Nov. 11, 2024   

PostImage

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार शक्तीमान...भारतातील पहिल्या सुपरहिरो चा दमदार कमबॅक...!


Shaktiman Comeback : 90 च्या दशकातील लहान मुलांना अक्षरक्ष: वेड लावणार शक्तिमान पुन्हा एकदा परतणार आहे. लहान मुलांचा भारताचा पहिला सुपरहिरो 'शक्तिमान' दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांनी शक्तिमान मालिकेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुकेश खन्ना यांनी शक्तिमान मालिकेचा टीझर शेअर करत चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शक्तिमानचा टीझर शेअर करत याची माहिती दिली आहे. शक्तिमान शोच्या नव्या टीझरमध्ये जुन्या शोच्या काही क्लिप दाखवण्यात आल्या आहेत. 

शक्तिमान हे प्रसिद्ध "शक्तिमान" या दूरदर्शन मालिकेतील पात्र आहे. शक्तिमान ही दूरदर्शन मालिका प्रथम १३ सप्टेंबर १९९७रोजी प्रसारित करण्यात आली. मुकेश खन्ना यांनी शक्तिमानची भूमिका केली होती.

शक्तिमान हे भारतीय दूरचित्रवाहिनीला "सुपरमॅन"वरून प्रेरणा घेतलेले पहिले पात्र आहे.

शक्तिमान विविध शक्तींचा वापर करून वाईट गोष्टीविरुद्ध लढतो व शेवटी विजय सत्याचाच होतो, या तत्त्वावर जीवन जगतो.

शक्तिमान हा दिवसा सर्व लोकांत गुप्त प्रकारे "पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शात्री" या नावाने पत्रकाराच्या भूमिकेत वावरत असतो..

 

90 च्या दशकात 'शक्तिमान' च्या रुपात पहिला सुपरहिरो मिळाला होता. 1997 ते 2005 या दरम्यान शक्तिमान मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. 90 च्या दशकात या मालिकेने लहान मुलांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मुकेश खन्ना यांनी काही काळापूर्वी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलं होतं, या मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. लवकरच, 'शक्तिमान'चे चाहते त्यांच्या बालपणीच्या आणि भारताच्या पहिल्या सुपरहिरोला पुन्हा पाहू शकतील. मात्र, लोकांमध्ये तो कधी प्रसारित होणार हे अद्याप कळलेले नाही.

शक्तिमान ही मालिका जशीजशी प्रसिद्ध होत गेली, तसे तसे मालिकेत देशभक्तिपर तसेच स्वच्छतेचे संदेश देणारे छोट्या चित्रफिती टाकण्यात आल्या व कार्यक्रमाशी त्या दाखवल्या जात असत.

शक्तिमान ही "सुपरहीरो" मालिका दूरदर्शन वरील एकुलती एक अशी मालिका आहे की जिने ४००पेक्षा जास्त भाग पूर्ण केले. त्यानंतर "आर्यमान", "जूनियर जी" इत्यादी मालिका आल्या, पण त्यांना हे यशाचे शिखर गाठता आले नाही.

२००१ मध्ये गुजरातच्या भूकंपामध्ये हानी झालेल्या भागांना शक्तिमान अवतारात मुकेश खन्ना यांनी भेट दिली व मदत केली.

प्रसिद्धी बरोबरच या कार्यक्रमास काही लोकांच्या रोषास पण सामोरे जावे लागले, शक्तिमान मालिकेत हवेत एक बोट उंच करून उडत असतो, व संकट समयी सामान्य नागरिकांची मदत करत असतो - ही गोष्ट मुलांच्या मनावर इतकी बसली - की लहान मुले या काल्पनिक पात्राला खरे समजून स्वतः पण एक बोट वर करून उडायचा प्रयत्न करू लागले , व शक्तिमानला भेटायचे म्हणून स्वतःला मुद्दामहून संकटात टाकू लागली. यातून बऱ्याच मुलांनी स्वतःला दुखापत करून घेतली.

 

मुकेश खन्ना यांच्या भीष्मा इंटरनॅशनल या यूट्यूब चॅनलवर याचा एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये असं लिहिलं आहे की, आजकाल अंधार आणि वाईट गोष्टी मुलांवर वर्चस्व गाजवत आहेत, अशा परिस्थितीत भीष्म इंटरनॅशनलने भारताचा पहिला सुपर टीचर, सुपरहिरो परत आणला आहे. या व्हिडीओमध्ये पुढे, मुकेश खन्ना स्वातंत्र्यासाठी एक गाणं गाताना दिसत आहेत, ज्याच्या ओळी आहेत 'आझादी के दिवानो ने जंग लडी फिर जाने दी, अंग अंग काट गए मगर पर आंच वतन पर ना आने दी'.

 

 


PostImage

Avinash Kumare

Nov. 8, 2024   

PostImage

मरण्याअगोदर काहीतरी करायचं बाकी राहील...


■■.. मरण्या अगोदर काहीतरी करायचं बाकी राहिलं...■■ 

कधी कधी वाटत बस आता स्वतःला 
संपवून टाकायचं बाकी राहील
आणि या जगाचं कायमच निरोप घ्यायचं बाकी राहील 
पण आतील मन मला सांगते अजून 
खूप काही करायचं  राहील 
स्वतःला ध्येयाच्या पाळण्यात झोकायचं बाकी राहील 
क्षितिजाच्या पलीकडे जाऊन
पाखरांसारखी उडायचं बाकी राहील......!🕊️🕊️🕊️
पण मरण्या अगोदर काहीतरी करायचं बाकी राहिलं... 

कधी कधी वाटत बस एवढंच जगणं पुरेसा राहील
पण आईचा 😊हसरा चेहरा बघून 
तिच्यासाठी काहीतरी करायचं बाकी राहिलं....!

🎋🍃ती राना वनात जाताना तिच्या पायाला 
काटा रुतायच्या आधी माझ्या हाताच 🫴🏻
आधार द्यायच बाकी राहील...
आणि रोज सकाळी तिच्या हातच 😋🥭🍓आंबट गोड फळ आणि कण्याची भाकरी मटकी चा उसळ 
खायच बाकी राहील........!
पण मरण्या अगोदर काहीतरी करायचं बाकी राहिलं.....!

माझ्या आयुष्यात खूप साऱ्या 
🌌काळोख्याच अंधार दाटून आहे...
त्यामध्ये फक्त सुवर्ण दिवसाची 
पहाटेच उजेड व्हायच बाकी राहील.....🌄
प्रकृती ने जरी साथ दिली तर आकाशावर पण🌈☁️
राज्य करायचं बाकी राहील....! 
पण मरण्या अगोदर काहीतरी करायचं बाकी राहिलं.....! 

कधी कधी वाटत बस आता 
एवढंच जगणं पुरेस राहील...
पण जिगरी दोस्तांचे चेहरे👬👬 डोळ्यासमोर दिसले 
तर त्यांच्या  अविस्मरणीय आठवणी त्यानाच त्यांचे किस्से सांगायचं बाकी राहिलं....🤞🏻🫶🏻

🍃❤️मैत्रीच्या प्रेमाचं माया ममतेचा कर्ज सोडवायच बाकी राहील...
दोन जीवांच्या तुटलेल्या प्रेमाच्या नात्यांना जोडायचा बाकी राहील....
त्यांच्या शी शेवटची प्रेमळ मिठी मारायची बाकी राहिली.....🫀🫂❤️
आणि दूर कुठंतरी लांब जाऊन स्वतःला सिद्ध करायचं बाकी राहील.......! 

स्वतःला ध्येयाच्या पाळण्यात झोकायचं बाकी राहील
क्षितिजाच्या पलीकडे जाऊन पाखरांसारखी उडायचं बाकी राहील.....🕊️🕊️🕊️☁️🏔️
पण मरण्या अगोदर काहीतरी करायचं बाकी राहील 
पण मरण्या अगोदर काहीतरी करायचं बाकी राहील.....!

                  ...✍🏻❤️लेखक व कवी ~ अविनाश कुंमरे 


PostImage

Avinash Kumare

Oct. 21, 2024   

PostImage

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सततच्या धमक्यांमुळे सलमान खान ने खरेदी केली …


 

 माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव आल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. लॉरेन्स बिश्नोई अनेक वर्षांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. पण, आता बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पोलीस प्रशासन अधीक सक्रीय झाले आहे. 

 

सलमान खानकडे यापूर्वीही बुलेटप्रूफ कार होती

गेल्या वर्षीही सलमान खानच्या कारची बरीच चर्चा झाली होती. ती सुद्धा निसानची बुलेटप्रुफ कार होती जिचा नंबर एकदम खास होता. वास्तविक, सलमान खानच्या जुन्या कारचा नंबर होता 2727, जो अभिनेताच्या जन्मतारीख 27 डिसेंबर 1965 शी संबंधित आहे. आत याचदरम्यान अभिनेत्याने नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. 

 

1998 च्या काळवीट प्रकरणापासून अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सतत धमक्या येत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून हा मुद्दा चांगलाच तापला आहे. काही काळापूर्वी सलमान खानच्या घर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येही गोळीबार झाला होता. 

 

Salman Khan New Bulletproof Car : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ताफ्यात नव्या लक्झरी कारचा समावेश झाला आहे. ही कार बुलेटप्रुफ (Bulletproof Car) आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमान खानची आणकी कडक करण्यात आली आहे. सलमान खानच्या जुन्या कारमध्येही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही बदल करण्यात आल्याची माहिती आहे. 12 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सलमान खानचे मित्र बाबा सिद्दीकी यांची सुरक्षाव्यवस्था असतानाही हत्य करण्यात आली होती. याची जबाबदरी बिश्नोई गँगने घेतली. त्यामुळे आता सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. 

 

 

आता सुरक्षेच्या कारणास्तव त्याने ही तिसरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत 2 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या आधीच्या कारप्रमाणेच सलमान खानने ही नवीन कारदेखील दुबईहून आयात केली आहे.  

 

दरम्यान, सुरक्षेसाठी घेतलेल्या गाडीत बॉम्ब अलर्ट इंडिकेटर, गोळीबारापासून संरक्षण करण्यासाठी जाड मजबूत काच आणि टिंटेड खिडक्या आहेत, जेणेकरून वाहन चालक आणि वाहनात बसलेल्या व्यक्तीला पाहता येणार नाही. दरम्यान, एकीकडे सलमान स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेत असून दुसरीकडे तो बिग बॉस १८ चं चित्रिकरणही करत आहे. १७ ऑक्टोबर रोजी सलमान 'बिग बॉस' च्या सेटवर पोहोचला होता आणि त्याने 'वीकेंड का वार'चे दोन्ही भागांचे चित्रिकरण केले आहे. 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

Oct. 7, 2024   

PostImage

शेवटी सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सिजन 5 चा …


Bigg Boss Marathi Season 5:  बिग बॉस मराठी सीझन ५ चा काल ग्रँड फिनाले पार पडला. या ७० दिवस चाललेल्या या शोमधून सर्वच सदस्यांनी खूप चांगले आणि उत्तमरीत्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. त्यावेळी त्याला खूप काही सहन कराव लागत होतं. लोकांचे टोमणे अश्लील शब्दात केलेली कमेन्ट या बऱ्याच गोष्टीचा त्याला सामना करावा लागत होतं. पण जेव्हा बिग बॉस ने त्याला त्याच टेलेंट दाखवण्याची संधी दिली. आणि त्या संधीच त्याने सोन केलं. तेव्हा सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, आणि सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष त्यामुळे त्याच निखळ मनाने केलेले टास्क गेम सगळे उत्तमरीत्या पार पाडले म्हणूनच सम्पूर्ण सिजनमधील खेळ चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला.  

एकंदरीत त्याच गेम बघायला गेलं तर खूप छान होता पण त्याच्या विरोधात असलेले काही स्पर्धक हे त्याला नेहमी त्याला त्याच्या टोचून बोलायचे आणि त्याच्या वागणूकीं वरून त्याला बौद्धिक क्षमतेत त्याला कमजोर समजत होते. त्याला तो स्वतःच्या मतांवर ठाम नाही म्हणून रोज त्याच्या वर काही न काही विषय घेऊन बोलत होते. आणि त्याला गोंधळात पाडत होते. पण सूरज ला हा खेळ अगोदरच समजलं होत म्हणून तो स्वतः कधीच डगमगला नाही. 
तो एकटाच खेळला एकटाच झुंजला आणि शेवटी कुणाचेही शब्द मनावर न घेता सगळं कसं झापुक झुपुक करतच त्याने सगळ्या प्रश्नाचे उत्तर सोडवलीत.....यालाच तर खरा मानवी भावनेचा खेळ मानल्या जाते आणि सोबतच लोकांचे भयंकर प्रेम अख्खा महाराष्ट्र 70 दिवस त्याच्या बाजूने बोलत होता. त्याला भरपूर सपोर्ट आणि लोकांचं मत मिळालं म्हणून आज त्याची एक वेगळीच इमेज महाराष्ट्रासमोर तयार झाली..! 
झापुक झुपुक बच्चा...! झापुक झुपुक बच्चा...! 
आय लव यु ना पिल्लू......! हे म्हणू म्हणू 
 त्याने अख्या महाराष्टाला त्याने वेड लावलाय....! 


 
बऱ्याच लोकांच गैरसमज आहे की त्याला त्याच्या साध्या स्वभावामुळे किंवा त्याच्या गरिबीमुळे किंवा त्याच्यावर दया माया करून  मेहरबान होऊन ही ट्रॉफी मिळाली नाही आहे. तर त्याने या 70 दिवसाच्या खेळात खूप काही केलं आहे. त्याने खूप मेहनत केली आहे. पण काही बऱ्याच लोकांना दिसत नाही पण असो देव त्याच्या पाठीशी नेहमी राहिल आणि त्याला अजून चांगले यश मिळत राहील...!  

अख्ख्या मराठी बिग बॉस च्या इतिहासातील हा पहिला खेळ असा रंगला हा सिजन असा गाजला की ज्या लोकांना बिग बॉस ची सवय नव्हती किंबहुना त्याना माहिती पण नसेल याबद्दल त्यांना पण बघायला लावणारा आपल्या मातीचा एकमेव  हिरो म्हणजेच सूरज चव्हाण त्याच्या समोरच्या यशस्वी वाटचालीसाठी आमच्या या डिजिटल मीडिया कडून खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐


Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी प्रसिद्ध रिलस्टार सूरज चव्हाणने झापूक झुपूक करत जिंकली आहे. घरातल्या सगळ्यांच सदस्यांना 'गुलीगत धोका' देऊन सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्यामुळे सूरजच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या विजयासह सूरजवर बक्षीसांचाही वर्षाव झाला आहे.  

सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यामुळे 14 लाख रुपयांचा चेक मिळाला आहे. तसेच सूरजला पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आली आहे. तसेच सूरजला एक गाडीदेखील बक्षीस म्हणून मिळाली आहे. त्यामुळे सूरजचा भरघोस बक्षीस मिळाली आहेत. 

अश्याच प्रकारच्या नवनवीन चालू घडामोडी व अन्य ताज्या बातम्या  सरकारी माहिती व खाजगी व सरकारी नोकरी संदर्भात विस्तृतपणे माहिती  घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024   

PostImage

Jawed akhtar news: अभिनेत्रींना लग्नाआधी अनेकांसोबत झोपायचं असतं!' म्हणत यश …


जावेद अख्तर त्यांच्या रोखठोक वक्तव्यमुळे कायम चर्चेत असतात. ते वक्तव्य करताना अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. अनेकदा त्यांची वक्तव्य चर्चेत असतात. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सिनेमात महिलांना दिलेल्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे.

 

आत्तापर्यंत श्रीदेवी आणि माधुरी सारख्या अनेक प्रतिभावान अभिनेत्री बॉलिवूडमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. मात्र कधीही त्यांना मोठी भूमिका मिळाली नाही. याचबरोबर त्यांनी शाहरुखच्या जब तक है जान सिनेमावर देखील संताप व्यक्त केला आहे. या सिनेमात अनुष्का शर्मा वेगवेगळ्या राष्ट्रीयतेच्या लोकांसोबत झोपण्याबद्दल बोलत आहे. यावर जावेद अख्तर म्हणाले की, 'आजकाल चित्रपट निर्मात्यांना सशक्त असणं काय असतं हेच कळत नाही, त्यामुळेच अशा भूमिका नायिका मिळत आहेत'

 

टॅलेंटेड एक्ट्रेसला नाही मिळत आयकॉनिक रोल

आजकाल सिनेमात महिला सशक्तिकरण ज्याप्रकारे दाखवलं जातं जावेद अख्तर त्यावर नाराज आहेत. एबीपीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर म्हणाले आहेत की, श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित सारख्या अनेक प्रतिभावान अभिनेत्री येवून गेल्या. पण त्यांना कधीच मोठ्या भूमिका मिळाल्या नाही. मदर इंडिया, बंदिनी, सुजाता आणि साहिब बीवी और गुलाम सारख्या आयकॉनिक ठरलेल्या चित्रपटांच्या ऑफर त्यांना मिळाल्या नाहीत. यश चोप्रा यांनी फार चांगले नाही पण चांगले चित्रपट केले. संपूर्ण कारकिर्दीत कम्प्लीट मूवीज बनवले.

 

जावेद अख्तर पुढे म्हणाले, आजचे सिने निर्माते सशक्त महिलाची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना कळत नाही की खरच सशक्त महिला कोण आहे? यश चोप्रांच्या चित्रपटाचे उदाहरण देताना ते म्हणाले, त्यांच्या जब तक है जान या चित्रपटाची नायिका म्हणते, 'शादी के पहले में पूरी दुनिया में अलग-अलग एक्सेंट वाले मर्दों के साथ सोऊंगी' असं ती म्हणते. एवढी मेहनत करायची काय गरज आहे?

 

जावेद अख्तर पुढे म्हणाले, सशक्त होण्यासाठी तुम्हाला इतकं हार्ड वर्क करण्याची गरज नाही. यात त्यांना मॉडर्न महिला दिसते. सशक्त महिला म्हणजे काय त्यांना माहित नाही. त्यामुळे महिलांना चांगल्या भूमिका मिळत नाहीत. सिनेमात हिरो गाणं गातो, डान्स करतो किंवा अॅक्शन करतो तेव्हाच चित्रपट पूर्ण होतो, असं यावेळी जावेद अख्तर म्हणाले. चित्रपटात कोणताही कॉन्टेंट नसल्याचे त्यांनी सांगितलं चित्रपट निर्माते आणि लेखकांना कॉन्टेंट काय आहे हे समजत नाही कारण समाजच त्याबद्दल स्पष्ट नाही. लोकांना आवडेल अशा कॉन्टेंटवर चित्रपट बनवता येत नाही. असं जावेद अख्तर त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले.